नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांनी पौर्णिमेचे औचित्य साधून ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत मनपा-ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली.
प्रत्येक पौर्णिमेच्या निमित्ताने नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते आणि शहरातील एका चौकात जनजागृती अभियान राबविले जाते. आज (ता. २७) चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमात आमदार प्रा. अनिल सोले सहभागी झाले. यावेळी त्यांनीही स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. स्वयंसेवकांसोबत त्यांनीही व्यापाऱ्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व समजावून सांगितले. नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी याबाबत बोलताना म्हणाले, दिवसेंदिवस या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढत असून आता उत्स्फूर्तपणे अनावश्यक वीज दिवे पोर्णिमा दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशीही नागरिक बंद ठेवत आहेत. या उपक्रामाची सर्वच पातळीवर दखल घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनजागृती अभियानात नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, सचिन फादे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ् चैटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसरकर, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यादव, दादाराव मोहोड आणि मनपा धरमपेठ झोनच्या विद्युत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
अधिक वाचा : सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन