नागपूर : कोव्हिड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने कोव्हिड-19 हे अँप नागपूर शहरातील नागरीकांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सदर अँप डाऊनलोड करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
किराणा सोबतच आता भाजी, दुधचीही घरपोच व्यवस्था – १४० विक्रेत्यांची यादी
यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, अँप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी. या अँपमध्ये काही प्रश्न विचारले जातील त्यानुसार संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावे. सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना कळेल. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर संबंधितांशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतील, असे त्यांनी सांगितले.
‘कोव्हिडं-19’ अँप लिंक –
‘कोव्हिडं-19’ अँप डाउनलोडल करण्यासाठी https://bit.ly/nmccovid19app ही लिंक क्लिक करावी लागेल. मात्र सदर अँप फक्त कोव्हिड- १९ चे लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास असणा-या नागरिकांसाठी आहे. इतरांनी सदर अँपचा वापर करु नये, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ही अँप ७२ तासानंतर गुगल प्ले स्टोर वर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून घरपोच सेवा देणा-या किराणा दुकानांची यादी