‘पोर्णिमा दिवसा’चे आयोजन : नागपूर महानगरपालिका-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम

Date:

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने वीज बचतीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रत्येक पोर्णिमेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोमवारी (ता. २१) पंचशील चौकात मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी जनजागृती करीत अनावश्यक वीज दिवे एक तास बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंत संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या उपक्रमात विद्युत विभागाचे सहायक अभियंता ए. एस. मानकर, धरमपेठ झोनचे उपअभियंता एम. एम. बेग, कनिष्ठ अभियंता जी. एम. तारापुरे, सुनील नवघरे उपस्थित होते. यावेळी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी पंचशील चौकातील प्रत्येक प्रतिष्ठानात जाऊन वीज बचतीबाबत जनजागृती केली.

पोर्णिमा दिवस आयोजनाबाबत माहिती दिली. नागपूर शहरात पोर्णिमा दिवस हा उपक्रम मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत असून या माध्यमातून पोर्णिमेच्या दिवशी रात्री ८ ते ९ या वेळात अनावश्यक वीज दिवे बंद करावे, असे आवाहन मनपा आणि ग्रीन व्हिजीलद्वारे करण्यात येत असल्याचे स्वयंसेवकांनी व्यापाऱ्यांना सांगितले. या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ३० हजार युनीट वीज बचत झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

स्वयंसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचशील चौकातील व्यापाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. एक तास वीज बंद ठेवून वीज बचतीच्या चळवळीत योगदान दिले. नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने परिसरातील पथदिवेही बंद करण्यात आले होते. या उपक्रमात महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांचा सहभाग राहात असून त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आता चळवळीचे रूप घेत असल्याची माहिती ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी यावेळी दिली.

जनजागृतीच्या या मोहिमेत ग्रीन व्हिजीलचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, दादाराव मोहोड, दिगंबर नागपुरे यांनी सहभाग नोंदविला.

अधिक वाचा  : कमला नेहरू महाविद्यालयात लोकशाही पंधरवाडा जनजागृती

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

DMMC & SMHRC Earns International Praise From Ugandan High Commission

Mr. Balunywa Baker Attache, Ugandan High Commission, recently paid...

Happy Mother’s Day 2024 : Date, Wishes, Quotes, Whatsapp Messages.

Mother's Day is celebrated all over the world every...

Akshaya Tritiya 2024 : Date History, Significance & More…

Also called Akha Teej, Akshaya Tritiya is a key...