चर्चेत असलेला अभिषेक बच्चनचा ‘द बिग बूल’ सपशेल फेल

चर्चेत असलेला अभिषेक

मुंबई: अभिषेक बच्चनचा

चर्चेत असलेला अभिनेता अभिषेक बच्चनचा चित्रपट ‘द बिग बूल’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ८ एप्रिलला रिलीज झाला आहे. शेअर मार्केटमधील १९९२ मध्ये झालेल्या सर्वात मोठा घोटाळ्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हर्षद मेहताची भूमिका अभिषेकने द बिग बूल चित्रपटात साकारली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी अभिषेकला ट्रोल केले आहे. एका युजर्सने अभिषेकच्या अभिनयावर टीका केली. यावर अभिषेकने त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

याआधी ‘स्कॅम १९९२’ ही वेबसीरीज रिलीज झाली होती. यामध्ये अभिनेता प्रतिक गांधीने मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुऴे नेटकरी प्रतिक आणि अभिषेकचा फोटो एकत्रपणे शेअर करुन त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

एका ट्रोलरने अभिषेकच्या अभिनयाला खराब प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये म्हटलंय की-‘नेहमीप्रमाणे अभिषेक बच्चनने आपल्या कथित थर्ड रेट ॲक्टिंग…या चित्रपटाने निराश केले आहे. प्रतीक गांधीची स्कॅम १९९२ यापेक्षा खू दर्जेदार होती.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याला अभिषेकने उत्तर दिलंय की, ट्रोलरच्या या ट्विटवर अभिषेकने शांतपणे परंतु रोखठोक उत्तर दिले आहे. त्याने त्याच्या ट्विटला उत्तर देत लिहिलंय की, ‘हाय मॅन, जसं की, मी तुम्हाला निराश नाही केले त्याकरता मी खूप खूश आहे. आमचा चित्रपट पाहण्याकरता तुम्ही आवर्जून वेळ काढलात त्याकरता मी तुमचा आभारी आहे’.

या चित्रपटात इलियाना डिक्रूझ प्रमुख भूमिकेत आहे.