रेल्वे स्थानकांवर फडकणार राष्ट्रध्वज

Nagpur Railway Station

नागपूर : देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर यापुढे राष्ट्रध्वज तिरंगा डौलाने फडकणार आहे. तसेच आदेशच रेल्वे बोर्डाने जारी केले आहेत. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्तादिनी रेल्वेस्थानकांवर झेंडा वंदन होतेच पण यापुढे कायमस्वरूपी रेल्वे स्थानकांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. रेल्वे स्थानकावर राष्ट्रध्वज लावण्याची मूळ कल्पना मध्य रेल्वे नागपूर विभागातील आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांची आहे. तीन-चार महिन्यापूर्वी सतिजा यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना यासंदर्भात पत्र पाठविले होते. रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज लावल्यास त्याचा फार चांगला परिणाम होईल. प्रवाशांमध्ये असलेली राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागेल, त्यामुळे यावर विचार करावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली होती. रेल्वे बोर्ड अध्यक्षांनी ही कल्पना उचलून धरली. व आता तसे आदेशच जारी केले आहेत. याबाबतचे पत्र रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक विवेक सक्सेना यांनी सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना पाठविले आहे.

अधिक वाचा : नागपुरात होणार पक्षी अकादमी

Comments

comments