केप कॅनरव्हल (अमेरिका) : मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे रहस्य अजून तरी रहस्यच आहे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी नुकतेच लॅडिंग केलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) इनसाईट यानाने पहिल्यांदाच मंगळवरील वाहत्या वाऱ्याचा आवाज नोंदविला आहे.
‘नासा’चे एक शास्त्रज्ञ सिल्वानो पी. कोलंबानो यांनी एलियन्स म्हणजेच परग्रहवासी पृथ्वीवर येऊन गेल्याचा दावा केला आहे. आता मंगळावरील आवाजाची ऑडियो क्लीप नासाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
BREAKING: Humans have never before heard the sound of wind on Mars until now! Listen to #SoundsOfMars as recorded by @NASAInSight as Martian winds swept over our lander. Best with headphones or a subwoofer. https://t.co/VreQxcAnAM pic.twitter.com/yd98NgZgR3
— Jim Bridenstine (@JimBridenstine) December 7, 2018
ज्या वाऱ्याचा आवाज बंदिस्त झाला आहे त्याची तीव्रता कमी आहे. मात्र, यावरून मंगळावर वाहत्या वाऱ्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध होत आहे.
मंगळावरील वाऱ्याचा आवाज यानामधील एअर प्रेशर सेन्सर आणि सिसोमीटरमध्ये नोंद झाला आहे. ताशी १६ ते २४ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याची नोंद यात झाली आहे. वाऱ्यामुळे संपूर्ण यान हालत असल्याचे दिसून आले आहे. जो आवाज नोंद झाला आहे; तो परग्रहावरीलच असल्याचे इनसाईट यान मोहिमेतील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनचे थॉमस पाईक यांनी म्हटले आहे की आम्ही पृथ्वीवर ज्याचा अनुभव घेतला आहे त्यापेक्षा वेगळे काहीतरी ऐकल्याचा अनुभव मिळाला आहे.
मंगळ ग्रहावरील पृष्ठभागावर नासाचे इनसाईट यान २७ नोव्हेंबर रोजी यशस्वीरित्या उतरलं होतं. मंगळ ग्रह कसा तयार झाला, तेथील वातावरण याचे रहस्य हे यान जाणून घेणार आहे. मंगळावरील पृष्ठभागावर उतराताच या यानाने तेथील पहिले छायाचित्रही पाठविले होते. आता तेथील वाऱ्याचा आवाज नोंदविला आहे.
हे यान यावर्षी ५ मे रोजी कॅलिफोर्निया येथील वंडेनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरील एटलस वी रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आले होते.
अधिक वाचा : इंडिगोच्या ताफ्यात आता दोनशे विमाने