नंदा जिचकार महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी

Date:

नागपूर : नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांची महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

पनवेल येथे तेथील महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या पुढाकाराने रामशेठ ठाकूर इंटरनेशनल स्पोर्ट्स काम्प्लेक्स येथे महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुढील कार्यकाळा साठी महापौर नंदा जिचकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने दर तीन महिन्यानी परिषदेचे आयोजन करण्यात येते. त्यात महापौरांच्या समस्यांवर व विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात येते. महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर हे आहेत.त्यांनी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांची एकमताने महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. पनवेलमध्ये आयोजित दोन दिवसीय परिषदेत बृहनमुंबई। महानगर पालिका, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नवी मुंबई, वसई, विरार, पिम्परी-चिंचवड़, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, पनवेल याठिकाणचे महापौर आणि

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल मनपाचे आयुक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तथा महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजीत चौहान, परिषदेचे संयोजक लक्ष्मण लटके सहभागी झाले होते.

अधिक वाचा : ३० सप्टेंबर करवसुलीचे अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण करा; सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related