भारतीय हवाई दलाच्या दहशतवादी तळांवरील हल्याचे नागपुरात तरूणांकडून स्वागत

Date:

नागपूर : भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुदलाने घेतला असून ही केवळ सुरवात असल्याचे मत नागपूरच्या तरुणाईने व्यक्त केले आहे.

पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरील हल्ल्याचे नागपुरात स्वागत करण्यात येत आहे आणि यात तरुणाईदेखील मागे नाही. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागपूरच्या तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी एकच जल्लोष केला. भारत माता की जय, अशा घोषणा देत हवाई दलाच्या या कारवाईत जोशपूर्ण स्वागत या तरुणाईने केले आहे.

अधिक वाचा : दिव्यांगांना २ मार्चपासून ‘आपली बस’ मोफत

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related