नागपूर : महामेट्रोचे धावणार माझी मेट्रो अभियान सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचे कौतुक केले. त्यांनी ‘विश वॉल’वर ‘लवकरच नागपूरकर मेट्रोने प्रवास करतील’ असे लिहून लिखित ग्वाहीच शहरवासींना दिली.
झिरो माईल येथील माहिती केंद्र, लिटिल वूड, मेट्रो हाऊस यासह विविध ठिकाणी महामेट्रोतर्फे ‘विश वॉल’ लावण्यात आली. इतकेच नव्हे तर शहरात येणारे कलाकारदेखील या माहिती केंद्रात येऊन ‘विश वॉल’वर लिहून मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. ‘विश वॉल’ अभियानात कुठल्याही भाषेचे बंधन नाही. नागरिक आपल्या शब्दात मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. यात लहान मुलांसह, तरुणांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिक सहभाग नोंदवत आहेत.
यातील एका विश वॉलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी धावणार माझी मेट्रो अभियानाचेही कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर महामेट्रोच्या स्टॉलमध्ये उपस्थित होते. आतापर्यंत झालेल्या महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी महाव्यवस्थापक अनिल कोकाटे व इतर अधिकाऱ्यांनी दिली. लवकरच मेट्रोचा प्रवासी रन सुरू होणार असल्याने यासाठी महा मट्रोचे अधिकारी रात्रंदिवस कार्य करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.
अधिक वाचा : सचिन तेंदुलकर के हाथो “खासदार क्रीड़ा महोत्सव” के दूसरे सत्र का शानदार उद्घाटन