नागपूर : नागपूरमधील फुटाळा तलाव येथे पुन: हजारोच्या संख्येने तरुणाई २६ जानेवारी २०१९ यादिवशी “प्रजासत्तकदिनी” एकमताने राष्ट्रगीत म्हणणार.
“थरार राष्ट्रगीताचा” ह्या कार्यक्रमाचे व जनजागृतीचे मोहिमेचे “एक वादळ भारताचं” या चळवळीद्वारे आयोजन केले आहे. या चाळवळीचा उद्दयेश्य हा आहे की “सर्व सामाजिक व धार्मिक ठिकाणी झेंडावंदन व राष्ट्रगीत व्हावे, या साठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी हि चळवळ आहे. या कार्यक्रमाचा हेतू असा आहे कि लोकांना त्यांच्या संविधानिक कर्तव्यांबाबत जागृत करणे.
तसेच शिवकालीन युद्धकलेचा थरार (लाठीकाठी) सुद्धा नागपूरकर २६ जानेवारी ला फुटाळा येथे अनुभवतील. त्यासोबतच यावर्षी राजपथ दिल्ली परेडच्या धर्तीवर येथेही परेड होईल. SRPF Group ४ चे Brand पथकाचे सादरीकरण सुधा राहील. तसेच ढोलताशा पथक व मल्लखांबचे प्रात्यक्षिक सुद्धा राहील.