Nagpur : काय सांगता? नागपुरात साजरा केला चक्क कोंबड्याचा वाढदिवस

Date:

नागपूर : अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असतात आणि या पाळीव प्राण्यांवर घरच्या मुलांप्रमाणे जीव लावला जातो. या पाळीव प्राण्यांच्या प्रेमापोटी त्यांचे मालक त्यांचा वाढदिवस देखील थाटात साजरा करतात. कुत्रे, मांजर, गाय, बैल, पोपट अशा अनेक पाळीव प्राण्यांचे वाढदिवस अनेक कुटुंबात साजरे होताना आपण पाहतो. मात्र नागपुरात एका कुटुंबाने त्यांच्या कोंबड्याच्या वाढदिवस थाटात साजरा केलाय. या घटनेची चर्चा परिसरात रंगली असून कोंबड्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये राहणाऱ्या कागदेलवार कुटुंबात “कुचा” नावाचा हा कोंबडा सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर प्रचंड वायरल होतंय. उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात राहताना त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. या वेळी कुचाचे औक्षण करून गोडधोड खाऊ घालण्यात आले.

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी कुचा कोंबड्याचं पिल्लू असताना रस्त्यावर सापडला होता. कोंबड्या घेवून जाणाऱ्या गाडीतून तो पडला होता आणि जखमी झाला होता. सुरभीनं कुत्रा किंवा मांजर या कोंबड्याच्या पिल्लाला खाईल म्हणून त्या त्याला आपल्या घरी आणून त्याच्यावर उपचार केले होते. तेव्हापासून तो कागदेकर कुटुंबातील सदस्य झाला. 20 सप्टेंबरला कुटुंबात त्याला या घरात येऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुचासाठी श्रीखंड, काजू कतली, काजू -शेंगदाणे प्लेट मध्ये ठेवण्यात आले होते. शिवाय या कोंबड्याचा मित्र असलेल्या शेजारच्या बुलेट नावाच्या कुत्र्याला ही बोलावले होते. या कोंबड्याचा आयुष्यभर सांभाळ करणार असा कागदेलवार कुटुंबियांचा निर्धार आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...