नागपूर : कौन बनेगा करोडपतीमध्ये सध्या बालदिन साजरा होतोय. छोट्यांसाठीच्या या केबीसी मध्ये मुलांना जिंकायचेत 7 कोटी रुपये. फास्टेस फिंगरमध्ये बाजी मारली नागपूरच्या तुषित निकोसेनं.
या आठवड्यात बच्चेकंपनीसोबत बिग बी केबीसी खेळणार. महत्त्वाचं म्हणजे मुलांनी जिंकलेली रक्कम त्यांना 18 वर्षांचे झाल्यावर मिळणार. तुषितनं पहिल्या प्रश्नालाच लाइफ लाइन घेतली होती. पण नंतर तो खूप विचारपूर्वक खेळला. तुषित पुन्हा एकदा एका प्रश्नावर अडखळला. मग त्यानं जोडीदाराच्या लाईनचा उपयोग करून घेतला आणि 10 हजार रुपये जिंकला. यावेळी अमिताभ बच्चन रुपये असा उल्लेख करत नाहीत. तर पाॅइंट्स हा शब्द वापरतात.
तुषितनं बिग बींना स्वत: हातानं काढलेलं त्यांचं चित्र दिलं. यावेळी तुषितनं कराटेच्या बऱ्याच मुव्हज प्रेक्षकांना दाखवल्या. तुषितला कराटेचा ब्राऊन बेल्ट आहे. व्यवस्थित खेळूनही तुषित 6 लाख 40 हजारापर्यंत मजल मारू शकला. हे पैसे त्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळतील.
अधिक वाचा : आईने मोबाइल सोबत नेल्याने १४ वर्षीय मुलाने घेतला गळफास