नागपुर : महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ झोनमधील एस.के.बॅनर्जी मार्ग या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
स्विपर मोहल्ला (लालगंज)प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पश्चिमेस – महतो यांचे घर
उत्तरेस- प्रकाश महतो यांचे घर
उत्तर पूर्वेस -शेख यांचे घर
दक्षिण पूर्वेस – कृष्ण पराते यांचे घर
दक्षिणेस -सुदर्शन समाज भवन
दक्षिण पश्चिमेस – आशा फुलझेले यांचे घर
बिकाकी सोनार टोली प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पश्चिमेस -दुर्गा माता मंदिर
उत्तर पूर्वेस-गोवर्धन पाटील
दक्षिण पूर्वेस -गजानन देवीकर
दक्षिण पश्चिमेस-सावजी भोजनालय
गड्डीगोदाम प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिण पश्चिमेस -जयस्वाल रेशन शॉप
दक्षिण पूर्वेस -युवराज साखरे यांचे घर
दक्षिण पश्चिमेस -किशोर साहू यांचे घर
पश्चिमेस -अन्नपूर्णा मंदिर
पश्चिमेस -गड्डीगोदाम चौक
उत्तरेस -गुरुव्दारा जवळील रेल्वे गेट
पूर्वेस -फेमस लायब्ररी
शबरीमाता नगर प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिण पश्चिमेस-गौतम यांचे घर
दक्षिण पूर्वेस -राजेश चौगले यांचे घर
उत्तर पश्चिमेस-तिवारी आटा चक्की
उत्तर पूर्वेस- दिलीप राऊत यांचे घर
चंद्रमणीनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तर पश्चिमेस -बॉबी किराणा
दक्षिण पश्चिमेस -विनायक मेश्राम याचे घर
दक्षिण पूर्वेस -विमल गडपायले याचे घर
उत्तर पूर्वेस -मालाधारी (सुभाष डोंगरे)
एस.के.बॅनर्जी मार्ग प्रतिबंधित क्षेत्र
पश्चिमेस -गद्रे यांचे घराजवळ
उत्तरेस – प्रफुल्ल जोशी यांचे घराजवळ
पूर्वेस – आशीर्वाद पॅलेस समोरील रस्ता
दक्षिणेस-माईल्ड स्टोन बिल्डिंग
सहा भागातील प्रतिबंध हटविले, नागरिकांना दिलासा
मागील २८ दिवसात कोणताही कोविड-१९ चा रुग्ण आढळून न आल्याने शनिवारी शहरातील सहा भागातील प्रतिबंध हटविण्यात आले. यात धंतोली झोनमधील तीन तर मंगळवारी, धरमपेठ व हनुमाननगर झोनमधील प्रत्येकी एका भागाचा समावेश आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच शहरातील दीड डझन वस्त्यातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत, तर तीन डझन क्षेत्रात अजूनही प्रतिबंध कायम आहे.
शनिवारी प्रतिबंध हटविण्यात आलेल्या धरमपेठ झोनमधील प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले-आऊट सुदामनगरी, पांढराबोडी व धंतोली झोनमधील प्रभाग ३५ मधील पार्वतीनगर येथील नागरिकांनी १४ दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने प्रतिबंध हटविण्यात यावे, यासाठी आंदोलन केले होते. पांढराबोडी येथे सतत तीन दिवस आंदोलन करण्यात आले. पार्वतीनगरातही असंतोष उफाळून आला होता. परंतु नियमानुसार २८ दिवसात कोणताही रुग्ण आढळून न आल्यास प्रतिबंध हटविले जाते. या दोन्ही भागात रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली होती. प्रतिबंध हटविण्यात आल्याने आता या भागातील रहदारी पूर्ववत सुरू होईल. जीवनावश्यक वस्तूंसोबतच अन्य दुकाने सशर्त उघडली जातील.
येथील प्रतिबंध हटविण्यात आले
कुशीनगर, प्रभाग ३३ – मंगळवारी झोन
ट्रस्ट ले-आऊट सुदामनगरी, पांढराबोडी, प्रभाग १३ – धरमपेठ झोन
हुडको एसटी क्वॉर्टर गणेशपेठ, प्रभाग १७ – धंतोली झोन
जयभीमनगर प्रभाग ३३ – धंतोली झोन
पार्वतीनगर, प्रभाग ३५ – धंतोली झोन
काशीनगर टेकाडे हायस्कूल, प्रभाग ३४ – हनुमाननगर झोन