नागपूर पोलिसांनी केलि ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त

नागपूर पोलिसांनी केलि ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त

नागपूर : कळमना – कामठी मार्गावरील स्वामी विवेकानंदनगर परिसरात ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषांला अटक करण्यात आली आहे. मुंबई तून नागपुरात तस्करी करत आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकारने जप्त केली आहे. शहरात ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिला आणि पुरुषाचा सुगावा पोलिसांना लागलेला होता. ब्राऊन शुगरची तस्करी होणार आहे याची माहिती पोलिसांनी मिळताच परिसरात सापळा रचत आरोपींना अटक केली.

एक महिला आणि युवक हातात बॅग घेऊन गल्लीतून जात होते. पोलिसांना दिसताच त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. रेवन सीताराम ढोबळे आणि चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ५६१ ग्रॅम ब्राऊन शुगर आणि ४९० ग्रॅम इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत ३० लाख रुपये आहे. आरोपींविरोधात कळमना ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक वाचा : अंबाझरी तालाब ओवरफ्लो पर बदमाश ने बेखौफ लहराया हथियार : लोगो में दहशत