आठ परदेशी तबलिगींवर नागपुरात गुन्हे; `क्वारंटाईन’ मध्ये धाडले

Date:

नागपूर : दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये सहभागी होऊन नागपुरातील एका धार्मिक स्थळामध्ये विनापरवानगी मुक्‍काम करणाऱ्या आठ विदेशी नागरिकांवर तहसील पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्या आठही जणांना आमदार निवासातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट पाहता सध्या देशात लॉकाडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान दिल्लीतील निजामुद्‌दीन येथील मरकज येथे शेकडो लोकांनी एकत्र येऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करुन कोरोनाला आमंत्रण दिले होते. मरकज येथे देशभरातील नागरिकांसह विदेशांतील लोकही सहभागी झाले होते. दिल्लीतून अनेक जण आपापल्या राज्यात परतले, तर विदेशी नागरिक भारतातील विविध शहरांतील धार्मिक स्थळी मुक्‍कामी होते. अशाप्रकारे नागपुरात 56 मरकज जमाती आढळले होते. त्यांना आमदार निवासात कोरंटाईन करण्यात आले होते.

दरम्यान यांसह विदेशातील अन्य नागरिक नागपुरातील असल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर आणि उपनिरीक्षक स्वप्निल वाघ पथकासह सोमवारी शहरातील एका धार्मिक स्थळी पोहोचले. त्यांनी तेथे विदेशी नागरिकांबाबत चौकशी केली. तेथे चार विदेशी नागरिक असल्याची माहीती त्यांना मिळाली. पीएसआय वाघ यांनी तेथून चौघांना ताब्यात घेतले. तीन महिला दुसऱ्या ठिकाणी मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तेथे पोहोजून चार महिलांना ताब्यात घेतले. हे सर्व नागरिक यानगोन सिटी, म्यानमार-बर्मा येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर लॉकडाऊन उल्लंघन, व्हॉयलेटींग फॉरेनर्स ऍक्‍टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

7 मार्चला आले होतो नागपुरात

आठही विदेशी नागरिक 7 मार्चला नागपुरात आले. सुरूवातीला गिट्टीखदान परीसरातील एका धार्मिक स्थळी त्यांनी वास्तव्य केले. त्यानंतर त्यांनी गिट्टीखदानमधून तहसील परीसरात मुक्‍काम ठोकला. तेव्हापासून ते आठही नागरिक तहसील परीसरातच होते. पोलिस आयुक्‍तांनी आवाहन केल्यानंतरही त्यांनी पोलिसांनी माहिती दिली नाही, हे विशेष.

Also Read- Corona Virus in Nagpur; कोरोनासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...