नागपूर: हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट ठरणार वरदान

Date:

नागपूर : शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने करोना बाधित रुग्णांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यात हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट वरदान ठरण्याची शक्यता आहे. एमआयडीसीतील पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या या १३ केएल क्षमतेच्या ऑक्सिजन प्लान्टला कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्लान्टला भेट देत इन्स्टॉलेशनच्या प्रतिक्षेतील या नवीन प्लान्टला इमामवाड्यातील महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या हॉस्पिटलच्या ५० बेडला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

हवेने इन्स्टॉलेशन होणाऱ्या या प्लान्टची महापौरांना माहिती मिळताच त्यांनी बुधवारी या प्लान्टला भेट दिली. या प्लान्टची संपूर्ण माहिती घेतली. हवेने ऑक्सिजन तयार करणारा हा प्लान्ट कोव्हिड परिस्थितीत रुग्णालयात हलविल्यास त्याचा उपयोग गरजू रुग्णांना होऊ शकतो. हे लक्षात घेऊन महापौरांनी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना याबाबत माहिती दिली. आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त केले. आता हा प्लान्ट इमामवाड्यातील महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे. याचे इन्स्टालेशन लॉयन्स क्लब स्वखर्चाने करेल, असे लॉयन्सचे विनोद वर्मा यांनी यावेळी सांगितले.

सध्या ‘आयसोलेशन’मध्ये ३६ बेड असून लवकरच १४ बेडची नव्याने व्यवस्था करण्यात आली आहे. अशा एकूण ५० खाटांना या प्लान्टच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळेल. त्यामुळे येथे वापरण्यात येणारे गॅस सिलिंडर इतरत्र उपयोगात येऊ शकतील, असे महापौरांनी यावेळी सांगितले.

पाचपावली प्लान्टचे लोकार्पण रविवारपर्यंत                                                                                      पाचपावली सुतिकागृह आणि के.टी.नगर येथे मनपाचे कोव्हिड हॉस्पिटल तयार आहे. डॉक्टरांची नियुक्तीही झाली आहे. फक्त ऑक्सिजनअभावी ते सुरू करण्यात आले नाही. पाचपावली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीडमधून गॅसमध्ये परावर्तित करणाऱ्या ऑक्सिजन प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून ११० बेडकरिता येत्या रविवारपर्यंत या प्लान्टचे लोकार्पण करण्यात येईल. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने ११५ बेड आणि १६ आयसीयूसाठी हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट उभारण्यात येत आहे. १५ दिवसानंतर त्याचेही काम सुरू होईल. ऑक्सिजन पुरवठ्याच्या दृष्टीने मनपाचे रुग्णालय स्वयंपूर्ण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...