काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला घेऊन जा;अपहरणकर्त्याच्या अजब मागणीने पोलिसही चक्रावले

Nagpur: Senior citizen found with her throat slit in MIDC

नागपूर : स्वतःचा गळा काप आणि मर नाहीतर तुझ्या पुतण्याला संपवतो अशी धमकी देत एका इसमाने अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. ज्या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे, त्याच्या काकाने आईचे शोषण केल्याने हे कृत्य पीडितेच्या मुलाने केले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे गुरूवारी रात्रीच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. काकांचा मुडदा पाडा आणि पुतण्याला सुखरूप घेऊन जा असे फर्मान अपहरणकर्त्याने सोडले होते. मात्र पोलिस मागावर असल्याचा सुगावा लागल्याने अपहरणकर्त्याने अखेर अल्पवयीन मुलाची क्रूरपणे हत्या केली आहे. आपल्या आईचं शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या पुतण्याचा खून करून बदला घेण्यासाठीच पीडितेच्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्‍याचे समोर आले आहे.

सामान्यतः अपहरण हे पैशासाठी होत असते, पण नागपुरात मात्र परिवारातील एका व्यक्तीचे मुंडके छाटून आणा, नाहीतर मुलाला मारुन टाकीन, असा धमकीचा फोन अपहरणकर्त्याने केला. ते आले नाही म्हणून १४ ते १५ वर्षाच्या मुलाला अपहरणकर्त्याने मारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपल्या आईचे एका व्यक्तीने शोषण केले म्हणून त्याच्या पुतण्याला अपहरणकर्त्याने पळवून नेले. काकांचे मुंडके आणा आणि मुलाला घेऊन जा असा फोनही संबधीत मुलाच्या घरी केला. मात्र तसे झाले नाही आणि पोलिस मागावर लागल्याचे कळताच अपहरणकर्त्याने मुलाला मारुन टाकलं. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल (गुरूवार) रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला. दरम्यान सोनेगाव पोलिसांनी संशयीत आरोपीला पकडल्याची माहिती मिळाली आहे.