Nagpur : डॉ.देवकाबाई बोबडे हत्याकांड; पैशांसाठी सख्ख्या नातूनेच केली आजीची हत्या!

Date:

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवकाने आपल्या डॉक्टर आजीचा खुर्चीला हातपाय बांधून गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पैश्याच्या हव्यासापोटी ज्या आजीच्या अंगाखांद्यावर खेळला, वाढला तिचीच आरोपीने निर्दयीपणे हत्या केली.

नागपूर : शनिवारी रात्री नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या देवकाबाई बोबडे यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. मीतेश पाचभाई असे या आरोपीचे नाव असून तो मृत देवकाबाई बोबडे यांचा नातू आहे. त्यानेच ही हत्या केली असून पैशांसाठी ही हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

शनिवारी दिवशी सायंकाळ च्या वेळी नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत शहराला हादरून टाकणारी घटना घडली. 78 वर्षीय निवृत्त डाक्टर देवकी बोबडे यांची खुर्चीला हातपाय बांधून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक पद्धतीने तपास केला असता हत्या करणारा घरचाच असल्याचं पुढे आलं आहे. ही महिला ज्या घरात राहायची त्याच घरी त्यांची मुलगी आणि जावई राहतात त्यांच्याच मुलाने हे दुष्कृत्य केले आहे. आरोपी नातू हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता व त्याला पैशांची गरज होती.

त्याने आजी ला पैसे मागितले मात्र आजी ने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने निर्दयीपणे आजीची हत्या केली असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, पोलीस यात आणखी काही निष्पन्न होते का? याचा सुद्धा तपास करत आहे. या हत्येच्या घटनेने परिसर हादरला असून शहरात हळहळ माजली आहे. पण, पैश्याच्या हव्यासापोटी किंवा गरजे पोटी ज्या आजी च्या अंगाखांद्यावर खेळला, वाढला त्याच नातवाने तिची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे आता नेमका विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related