नागपूर : नागपूरमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी आणखी 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या 1299 वर पोहोचली होती. तर सोमवारी सकाळी त्यात आणखी 14 रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 1306 इतकी झाली आहे. त्यातच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या 20 वर गेली आहे. याचबरोबर 899 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका कोरोनाबाधितांचा मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे 20 पैकी 6 जण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. आजवर तब्बल 899 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या 387 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या नागपुरात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी मेडिलकमध्ये उपचार घेत असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या व्यक्तीला यकृत व श्वसनाचा त्रास होता. शहरातील विविध विषाणू प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी 29 अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एम्सच्या प्रयोगशाळेमध्ये 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. मेडिकलमध्ये एका 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. मेयोच्या प्रयोगशाळेमध्ये 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. यापैकी दोघे जण मेयोतच जाखल आहेत. तर खासगी प्रयोगशाळेमध्ये 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये अमरावती, दिल्ली, रामदासपेठ, मेहंदीबाग,त्रिमूर्तीनगर व कामठी येथून प्रत्येकी एक रुग्ण तर खरबी येथून दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनावर मात करून त्यातून मुक्त होणार्यांची संख्याही शहरात वाढत असल्यामुळे ही बाब जिल्हावासियांकरिता निश्चितच दिलासा देणारी आहे. आजवर शहरात कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 899 इतकी झाली आहे. कुठलेही लक्षणे नसल्याने काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालया व रुग्णालय येथून कोराडी येथील एका दोन वर्षीय चिमुकलीसह 9 जणांना कुठलेही लक्षण नसल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये सावनेर येथील 30 वर्षीय महिला, वाडी दाभा येथील 30 वर्षीय पुरुष यांचा यात समावेश आहे.
Also Read- मोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती