नागपूर रेल्वे स्थानकात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता पेट्रोल वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाडीला आग लागली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने अग्निशमनच्या दलाच्या पथकाने तातडीने आग नियंत्रणात आणली.
रेल्वे प्रशासनाला दुर्घटना वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी आणि मोठी वित्तहानी झालेली नाही. पण या दुर्घटनेमुळे पेट्रोल वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अधिक वाचा : प्लास्टिक बंदी कारवाईमध्ये दोन दिवसात ८० हजार रुपये दंड वसूल