महिलेची निघृणपणे हत्या करणाऱ्या दरोडेखोराला नागपूर येथे अटक

Date:

नागपूर : मुंबईमधील माटुंगा परिसरात एका ७९ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी व त्या महिलेची निघृणपणे हत्या करणाऱ्या दरोडेखोराला मुंबई पोलिसांच्या एका पथकाने नागपूर येथे अटक केली.

माटुंगा येथे राहणाऱ्या एका  जेष्ठ नागरिक महिलेच्या घरात घुसून चोरट्याने तिच्या अंगावरील ३० तोळे सोने आणि काही रोकड लुटली. या चोरट्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न सदर महिलेने केला. मात्र, आरोपीने महिलेची गळा दाबून हत्या केली आणि फरार झाला.

या घटनेतील आरोपी नागपूरात असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचे एक पथक तातडीने नागपूरला रवाना झाले.

या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव अकबर अमीर बादशाह असल्याचे समजते. नागपूर येथील हॉटेल ट्रेंड येथे एका मित्रासह आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नागपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला गजाआड करण्यास मुंबई पोलिसांना यश आले.

अधिक वाचा: नागपुरात गुंडागर्दी, २० ‘आपली बस’च्या काचा फोडल्या

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related