लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या : भास्याने मामाला संपविले

लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या : भास्याने मामाला संपविले

नागपूर :- उपराजधानित सध्या गुंडांचा धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे ज्याचे उदाहरण पुन्हा सोमवारी पाहायला मिळाले. भर दिवसा प्रतापनगरात पोलिस स्टेशन अंतर्गत लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या करण्यात आली. मृतकाचा भासा शुभम समवेत चार आरोपींनी धारदार शस्त्रांनी जवळपास १०-१२ घाव घालून एका युवकांचा खून केला.

लोखंडे नगरात कुख्यात गुंडाची ह्त्या : भास्याने मामाला संपविले

माहिती नुसार पप्पू उर्फ प्रवीण देवराव वंजारी वय ३५ , रा. प्रताप नगर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्रि उशिरा आरोपींना ताब्यात घेतले आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लोखंडे नगरात एका किराणा दुकानाजवळ भासा शुभम हा चार साथिदारासह तेथे आला. त्यांनी प्रवीणला घेराव घातला आणि काही कळायचा आत तलवार-चाकूने सपासप वार करण्यास सुरूवात केली.प्रवीण जीव वाचविण्यासाठी पळायला लागला. आरोपींनी प्रवीण पाठलाग करून हल्ला केला. प्रवीण रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला.सांगण्यात येते की प्रवीण हा पाच बहिणींमध्ये एकमेव भाऊ होता. त्याने दोन विवाह केले होते आणि एका महिले सोबत अवैध सबंध होते. वडीलाचे निधन झाल्यानंतर तो आई, पत्नी आणि दोन मुलांसह गोपाल नगरात राहत होता. प्राथमिकदृष्ट्‌या हत्याकांड गाडी चोरीच्या वादातू घडल्याचा अंदाज लावला जात आहे.

अधिक वाचा : उमरेड येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर वेकोली प्रशासन बनले मूक – बधिर