नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. निरुपम यांनी १० नोव्हेंबरला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांच्यावर अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आरोप केले होते.
आंतरराष्ट्रीय तस्करांशी मुनगंटीवार आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. यवतमाळ जिल्ह्यात १४ जणांचा बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीला गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून राज्य सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. मुनगंटीवार यांच्यासह भाजप नेत्यांचे तस्करांशी संबंध आहेत. त्यातून अवणीची हत्या झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता.
तसेच त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात जंगलकटाई झाल्याचे निरुपम यांनी म्हटल्याचे मुनगंटीवारांचे वकील शुकुल यांनी सांगितले. दरम्यान, निरुपम यांना समन्स जारी करायचे, की नाही यावर न्यायालय आज निर्णय घेणार असल्याचे शुकुल यांनी सांगितले.
अधिक वाचा : हा राहुल गांधींचा विजय : विजय बारसे