मुंबई आयआयटीसाठी १ हजार कोटी देणार- मोदी

Modi

मुंबई, ११ ऑगस्ट– मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात खुदीराम बोस यांना श्रद्धांजली वाहत केली. ६० वर्षांपूर्वी १०० विद्यार्थ्यांपासून आयआयटीने सुरू केलेला प्रवास आज १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहचल्याबद्दलही मोदी यांनी आयआयटी संस्थेचे अभिनंदन केले. आयआयटीचे डॉ. रमेश वाधवानी यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबाबतही मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. पायाभूत सेवासुविधांसाठी मुंबई आयआयटीला १ हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा मोदी यांनी या कार्यक्रमात केली. आयआयटीत शिक्षण घेऊन जगभरात देशाचं नावलौकीक विद्यार्थी करत आहेत. त्यांचा हा उत्कर्ष असाच पुढे चालत राहावा असेही मोदी यावेळी म्हणाले.

आयआयटीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आणि विकासासाठी पुर्ण मदत करण्याचे आश्वासन देत, येणाऱ्या दशकात जगाचा विकास आयआयटी टेक्नॉलॉजी ठरवेल असे वक्तव्यही त्यांनी केले. आज भारत स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या स्थानावर आहेत. अशीच उत्तोरोत्तर प्रगती करत आपल्याला इनोवेटीव्ह इंडीया बनवायचं आहे . हा इनोव्हेटीव्ह भारत बनवण्याची जबाबदारी तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे फक्त क्वान्टीटीच नाही तर क्वालिटी काम करण्यावर भर दिला पाहिजे असे पंतप्रधान मोदी या समारंभात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज शनिवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ५६ व्या वार्षिक पदवीदान समारंभाला संबोधित करण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत. या समारंभात मोदींनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे ज्ञान दिले. आयआयटीचा पदवीदान समारंभ झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई आयआयटीतील ‘डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग’ आणि ‘सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग’च्या नवीन वास्तूचे उद्घाटनदेखील केले.

हेही वाचा : पीएम मोदी लॉन्च करेंगे इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक, 21 अगस्त से होगा शुरू