‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाईन चॅलेंज गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे अनेक देशांनी या खेळावर बंदी घातली आहे. या खेळाची भीती कमी झालेली असतानाच आता सोशल मीडियावर आणखी एक जीवघेणा गेम व्हायरल होत आहे. मोमो चॅलेंज असे या गेमचे नाव असून या गेममुळे अर्जेंटिनामध्ये एका १२ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अर्जेंटिना, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, मेक्सिको अशा देशांमध्ये सध्या हे चॅलेंज पसरत आहे.
मोमो चॅलेंज हा खेळ देखील ब्ल्यू व्हेलसारखाच व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतो. ज्या व्यक्तीला टार्गेट करायचे असेल त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून मोमो चॅलेंजचा मेसेज पाठवला जातो. त्यांना त्या क्रमांकावर ‘मोमो’ असा रिप्लाय द्यायचा आहे. हा रिप्लाय दिल्यानंतर त्या व्यक्तीला चित्रविचित्र फोटो पाठवले जातात. यात एका महिलेचा विचित्र फोटो आहे. या महिलेचे डोळे बाहेर आले असून एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे. हा फोटो बघणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहतो.
अद्याप या चॅलेंजमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र याच चॅलेंजमुळे अर्जेंटिनामध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याचे समजते. त्यामुळे लोकांनी अशा चॅलेंजच्या आहारी न जाण्याचे आवाहन अर्जेंटिना, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, मेक्सिको या देशांतील सरकारने जनतेला केलेले आहे.
अधिक वाचा : 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद