नागपुर :- रेल्वेमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोराला आरपीएफ कर्मचाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने अटक केले. आरोपीकडून चोरीचे ७ मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महत्वाचे म्हणजे हां चोर स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून चोरी करायचा. चोराला पकडतानाचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
माहिती अनुसार राजेश हरिशंकर पांडे, असे या आरोपीचे नाव आहे. तो मध्यप्रदेशाच्या देवास येथील रहिवासी आहे. रविवारी रात्री पुणे-हटिया ही रेल्वे स्थानकावरुन निघाल्यानंतर राजेश गाडीतून बाहेर पडला. गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा पथकाचे कर्मचारी राजेश खंडारे आणि करण सिंग ठाकूर यांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी त्यांची चौकशी केली. मात्र, मी पोलीस अधिकारी आहे, असे म्हणत तो त्या कर्मचाऱ्यांचीच दमदाटी करू लागला.
त्यादरम्यान मोबाईलवर बोलण्याच्या बहाणा करत आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तिथे असलेल्या सैन्य जवानाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला पकडून देण्यात आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. हा सर्व थरार स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तपासा दरम्यान आरोपी कडून ७ मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल राजेश खंडारे आणि करण सिंग ठाकूर या कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
अधिक वाचा : विदर्भाला औद्योगिक विकासात अग्रेसर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस