मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अवैध बार, जुगारअड्‌य्यावर छापा

Date:

नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि अबकारी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महादुल्यात एका टीनाच्या शेडमध्ये अवैध बार आणि जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू होता. त्याच्या बावनकुळे यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. विशेष म्हणजे महादुला गाव त्यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात येते. बुधवारी सकाळी साडेसात वाजताच चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना घेऊन बारमध्ये धडकले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

लगेच येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. महादुला नगर पंचायच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोजरने बाराचे टीनाचे शेड तोडले. पोलिसांनी अड्ड्याचा चालक संतोष शाहू याला अटक केली.

अधिक वाचा : मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वर्धा व कामठी रोड करणार आणखी रुंद

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related