नागपूर : शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंंक्शन मेट्रो स्टेशनला रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधीचे प्रमाणपत्र महा मेट्रोला प्रदान केले असून बुधवार ९ डिसेंबर पासून हे मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहेत. सीताबर्डी इंटरचेंज आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान धावणारी प्रत्येक मेट्रो गाडी या दोन्ही ही स्थानकांवर दर १५ मिनिटाने थांबेल.
सप्टेंबर महिन्यात अजनी चौक, रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल झाले होते व उद्या पासून आणखी २ नवीन मेट्रो स्टेशन प्रवाश्याच्या सेवेत दाखल होत आहे. सीएमआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे १६ मेट्रो स्टेशनच्या ऐवजी आता १८ मेट्रो स्टेशनवरील मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध असेल.
उत्तर अंबाझरी मार्गावरील शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन ‘अँक्वा थीमङ्क वर बनविण्यात आले आहे. शंकर नगर चौक स्टेशनच्या परिसरात शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, बँक, बाजारपेठ तसेच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्टेशनचा परिसरातील नागरिकांना निश्चितच लाभ होणार आहे.
या व्यतिरिक्त रचना रिंग रोड जंक्शन स्टेशनच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. तसेच सदर स्टेशन qहगणा टी पॉर्इंट वर असून, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक हिंगणा व सिताबर्डीच्या दिशेने ये – जा करतात. या स्टेशनच्या मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, वसतीगृह, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते त्यामुळे आता सदर मेट्रो स्टेशन खुले झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. या दोन्ही स्टेशनच्या बाजूने आगमन, निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.