मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १५ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार

Date:

नागपुर :- मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरातील विविध प्रभागामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. याकार्यक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक १५ तर्फे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार हिरणवार पंचकमेटी मैदान, धरमपेठ येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक व आयोजक श्री.सुनिल हिरणवार होते तर प्रमुख  अतिथी म्हणून नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा. अनिल सोले, पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, कार्यक्रमाचे संयोजक सुनील हिरणवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभागातील नगरसेवक व स्थापत्य समिती सभापती श्री. संजय बंगाले, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा राय, प्रभाग अध्यक्ष अमर पारधी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला दहावीतील ६० गुणवंत विद्यार्थी व बारावीतील ६४ गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, वहया-पुस्तके, पेन, नोटबूक, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरूण मोगरकर, मनोज हिरणवार, अभय दीक्षित, जितू डोंगरे, भीम श्रीया, दिनेश चौधरी, मन्नुभाई हिरणवार, वीलास मंडारे, सोनु हिरणवार, हरिश हिरणवार यांनी प्रयत्न केले.
Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related