नागपुर :- नागपूर महानगरपालिका व आयसीएलईआय-दक्षिण आशिया यांच्यात नुकताच हवामान प्रक्रियेत गती आणण्यासाठी शहरी निम्न उर्त्सजन विकास प्रणाली (अर्बन लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी)च्या अंमलबजावणीसंबंधी सामंजस्य करार करण्यात आला.
आयसीएलईआय-दक्षिण आशिया व यून हॅबिटेट द्वारे युरोपियन कमिशनच्या सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभात महापौर नंदा जिचकार, आयुक्त वीरेंद्र सिंह, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनावणे, पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक देवेंद्र महाजन, गतिशीलता विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, जलप्रदाय विभागाचे दीपक चिटणीस, आयसीएलईआयचे उपसचिव व आयसीएलईआय-एसए चे कार्यकारी संचालक इमानी कुमार, आयसीएलईआय-एसए चे उपसंचालक सौम्या चतुर्वेदुला व आयसीएलईआय-एस ए चे प्रकल्प अधिकारी शार्दुल वेंगुरकर उपस्थित होते.
शहरातील कमी उत्सर्जन विकास (एलईडी) प्रणालीला प्रोत्साहन देत हरीतगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कमी करणे हा अर्बन एलईडीएस प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) अंतर्गत पॅरीस कराराशी हा प्रकल्प संलग्नीत आहे. महापालिका क्षेत्रातील पाणी, दुषीत पाणी, घनकचरा व्यवस्थापन, उर्जा, वाहतूक व नगर रचना यासह सर्व विभागातील उर्जेचा वापर कमी करून त्यातून उत्सर्जीत होणारा हरीतगृह वायू (जीएचजी)चे प्रमाण कमी करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.
या प्रकल्पामुळे हवामान बदलाची पुर्वतयारी करता येईल. शहरातील प्रभावित क्षेत्र लक्षात घेउन त्याद्वारा कृती आराखडा तयार करण्यात येईल. प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असून आधी एका ठराविक ठिकाणी प्रकल्पाची चाचणी घेउन त्यानंतर संपूर्ण शहरात ते लागू करण्यात येईल.
अधिक वाचा : द म क्षे सां.केंद्राद्वारे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह चे आयोजन