नागपूर, ता. ४ : महानगरपालिका नागपूर च्या वतीने सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा क्र. ३ पॅकेज क्र. ९ अंतर्गत मेडिकल चौक ते आशीर्वाद टॉकीज चौक दरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने ३ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीकरिता उजव्या बाजूने बंद राहील.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी एका आदेशाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. मेडिकल चौक ते आशीर्वाद टॉकीज चौका पर्यंतचा उजव्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने डाव्या बाजूच्या रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.