नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व्हेरायटी चौक स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आणि लक्ष्मीभुवन चौक स्थित लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला महापौर नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.
सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेविका श्रद्धा पाठक, सुमेधा देशपांडे, नगरसेवक राजेश घोडपागे, माजी नगरसेवक बंडु राऊत, काकी गुप्ता, माजी नगरसेविका रश्मी फडणवीस, सविता पारवे आदी उपस्थित होते. सदर गांधी चौक, गंजीपेठ आदी ठिकाणच्या पुतळ्यांनाही माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
अधिक वाचा : शहर में बड़े ही उत्साह के साथ मनाई गई महात्मा गांधी की १५० वी जयंती