नागपूर :अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक

Date:

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलिसांनी सूत्रधार ऑटोचालकासह चार आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडिता १७ वर्षीय अल्पवयीन असून गरीब कुुटुंबातील आहे. वहिनीने रागवल्याने ती २९ जुलै रोजी रात्री घराबाहेर पडली. मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डीला सोडण्यास सांगितले. त्याने तिला मानस चौकात सोडून दिले. तिथे दुसरा ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली. त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुऱ्यात घेऊन गेला. तिला दारू पाजली. एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलावले. आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले. तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली. त्यांनीसुद्धा तिच्यावर अत्याचार केला व फरार झाले. ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत होती. दरम्यान, दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले.

रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणाऱ्या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले. तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा जबाब नोंदवून घेतला.

दुसऱ्यांदा झाला अत्याचार
पीडित मुलीवर यापूर्वीही सामूहिक अत्याचार झाला आहे. यापूर्वी तिच्यावर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता. अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती; परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related