वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलीचा देखील हक्क असल्याचा कर्नाटक हायकोर्टाने निर्णय दिला आहे. वडिलांच्या नोकरीवर मुलाइतकाच विवाहित मुलींचाही अधिकार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. विवाहित मुलगीही वडिलांच्या कुटुंबातील घटक आहे. वडिलांच्या संपत्तीनंतर आता नोकरीवरही विवाहित मुलीचा हक्क असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
बंगळुरुच्या भुवनेश्वरी यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने हे म्हटलं आहे. सहानुभूतीच्या आधारावर निर्णय देताना कोर्टाने म्हटलं की, वैवाहिक जीवनात गेल्यानंतर ही मुलगी हे वडिलांच्या कुटुंबाचा भाग असते.
याचिकाकर्त्या महिलांचे वडील अशोक अदिवेप्पा मादिवालर यांच्या कृषी उत्पाद मार्केटिंग समितीच्या कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते. त्यांच्या वडिलांचा 2016 मध्ये मृत्यू झाला होता. खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलाने वडिलांच्या सरकारी नोकरीची इच्छा नाही दर्शवली. त्यामुळे त्यांच्या मुलीने नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज जॉइंट डायरेक्टर यांनी रिजेक्ट केला होता.
भुवनेश्वरी यांनी याला भेदभावपूर्ण व्यवहार असल्याचं म्हणत कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने लग्नानंतर मुलींना वडिलांच्या कुटुंबात हक्क नसल्याचा मुद्दा खोडून काढला.
जस्टिस एम. नागाप्रसन्ना यांच्या बेंचने म्हटलं की, महिलांची संख्या जगात अर्धी आहे. त्यांना जगात साधी संधी ही मिळू नये.? न्यायाधीशांनी म्हटलं की, जर वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलाचा अधिकार असतो, तर विवाहित मुलीचा अधिकार का असू नये. असं म्हणत कोर्टाने संबंधित विभागाला महिलेला नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत.