नागपूर: मारबत उत्सव नागपुर सहित विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि ऐतिहासिक परंपरागत पद्धतीने तान्हा पोळ्याला निघणाऱ्या मारबत आणि बडग्या यांची मिरवणूक हजारो लोकांचा उपस्थितीत आज सकाळी काढण्यात आली. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याकरिता ही मिरवणूक शहरात तान्हा पोळ्याच्या दिवशी काढली जाते.
शहरातील काळ्या मारबतीला १३७ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३३ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघून नेहरू पुतला येथे त्यांची गळाभेट झाली . ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजपर्यन्त सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही महापालिका, भ्रष्टाचार, दहशतवाद, शहरातील समस्या आदी विषयांवर बडगे काढले गेले. या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली गेली. मस्कासाथ भागातील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीतर्फे यंदाही बडग्या काढला गेला. शहरातील विविध भागात बडगे आणि मारबती तयार करण्याचे काम मागील काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती गेल्या ४५ वर्षांपासून विविध विषयांवर किंवा राजकीय नेत्यांचे बडगे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मासूरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकट नगर, पिवळीनदी, इतवारी आदी भागात बडगे तयार केले जाते. लालगंज, खैरीपुरा, नंदनवन झोपडपड्डी भागात बडग्या तयार केला होता.
बघा फोटोज :