Covid-19 test: ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान

Date:

नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे वेळेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे़ या काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कोरोनाचे तातडीने निदान होणे आवश्यक आहे. नीरीच्या शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवले आहे. ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान होत आहे. नीरीच्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अशा ५४ हजार टेस्ट केल्या आहेत.

पर्यावरण विषाणूशास्त्र कक्षाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राय स्वॅब टेस्टिंगमुळे केवळ वेळ वाचत नाही, तर पैसे व मनुष्यबळाचीही बचत होते. सध्या देशात सर्वत्र आरटीपीसीआर टेस्टिंग सुरू आहे. त्यात कोरोना विषाणूला सुरक्षित ठेवण्यासाठी विशिष्ट द्रवाचा उपयोग केला जातो. ड्राय स्वॅब टेस्टिंगमध्ये संबंधित द्रवाची गरज नाही. या पद्धतीत ४ डिग्री तापमानातील रिकामी ट्यूब वापरली जाते. ही ट्यूब सहज हाताळता येते. त्याद्वारे संक्रमण होण्याची शक्यता शून्य टक्के आहे. ही पद्धत केवळ नीरी लॅबमध्ये वापरली जात आहे. ही पद्धत सोपी असून या चाचणीचे ४० प्रयोगशाळांच्या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतरही ही पद्धत वापरण्यास उदासीनता दाखवली जात आहे. या टेस्टमुळे कोरोना चाचणीचा खर्च अर्ध्यावर आला आहे.

नागपूरमध्ये वापरण्याचा विचार                                                                                                येणाऱ्या काळात ही कोरोना चाचणी पद्धत नागपूरमध्ये वापरण्याचा विचार केला जाईल. ही पद्धत सोयिस्कर असून तिला आयसीएमआरने मान्यता प्रदान केली आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related