धुम्रपानाची सवय मोडण्यासाठी या व्यक्तीने पिंजऱ्यात बंद केले आपलं डोकं-तोडं, चावी असते पत्नीकडे!

Date:

काही सवयी फारच वाईट असतात. धुम्रपान त्यापैकीच एक वाईट सवय. अनेक लोक धुम्रपान सोडण्याचं संकल्प करतात. पण काही दिवसांनी त्यांचा निर्णय कमजोर पडतो. तशीही वाईट सवय सोडवणं फार कठिण मानलं जातं. अशात काही लोक अशा सवयी सोडवण्यासाठी काही जुगाड करतात. असाच एक जुगाड एका व्यक्तीने केलाय. त्याने धुम्रपानाची सवय मोडण्यासाठी तोंडावर एक खास प्रकारचा पिंजरा बनवला आहे.

रिपोर्टनुसार, तुर्कीच्या Ibrahim Yucel अनेक वर्षांपासून धुम्रपान करत होते. पण जेव्हा त्यांनी यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चांगलाच त्रास झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि एका खासप्रकारच्या हेल्मेटने आपलं डोकं-तोडं कव्हर करून घेतलं. जेणेकरून ते सिगारेट ओढू शकणार नाही.

इब्राहिम यांना मोटारबाइक रायडर्सच्या हेल्मेटवरून याची कल्पना सुचली. हा अनोखा पिंजरा त्यांनी १३० फूट कॉपर वायरपासून तयार केला आहे. इब्राहिम यांनी हे हेल्मेट थोडं वेगळं बनवलं आहे. बाइक रायडर्स त्यांना हवं तेव्हा त्यांचं हेल्मेट काढू शकतात. पण इब्राहिम यांना त्यांचं हेल्मेट काढण्यासाठी चावीची गरज पडते. आणि ती चावी त्यांच्या पत्नीकडे राहते.

इब्राहिम १६ वर्षांचे असतानापासून दिवसातून २ पॅकेट सिगारेट ओढत होते. पण जेव्हा फुप्फुसाच्या कॅन्सरने जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यानी परिवारासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी धुम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला. इब्राहिम यांचा हेल्मेट पक्ष्यांच्या पिंजऱ्यापेक्षा कमी नाही. ते हा पिंजरा केवळ खाता-पितानाच काढतात. पण त्यांना हा पिंजरा काढण्यासाठी पत्नी किंवा मुलांची मदत घ्यावी लागते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related