हमीरपूर: उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात ७ फेरे घेण्यापूर्वी होणाऱ्या नवरीचा अश्लिल फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर नवऱ्याने मध्येच लग्न रोखलं. त्यानंतर हातावर मेहंदी लावलेल्या नवरीनं आता कोतवाली पोलीस स्टेशनला पोहचून प्रियकरासोबत लग्न लावून देण्याच्या मागणीवर अडून राहिली आहे. पोलिसांनी मंगळवारी नवरीच्या तक्रारीवरून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
हमीरपूर जिल्ह्यातील मोहदा कोतवाली परिसरात एका गावात सोमवारी रात्री लग्नाच्या आनंदात विरजन पडलं. लग्न न करताच वऱ्हाड माघारी फिराल्यानं नवरीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. मुलीचं लग्न सदर कोतवाली येथील कुछेछा निवासी संजयसोबत निश्चित झालं होतं. नवरदेव आणि नवरी कडच्या सगळ्या मंडळींनी लग्नाची पूर्ण तयारी केली. घरात वऱ्हाडी मंडळींसाठी खाण्यापिण्याच्या वस्तूही आणल्या. अशातच अचानक नवरदेवाने मुलीकडच्या कुटुंबीयांन वऱ्हाड घेऊन येणार नाही असा निरोप दिला.
त्यानंतर नवरी थेट कोतवाली पोलीस स्टेशनला पोहचली आणि लग्न मोडल्याचं कारण समजताच प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. नवरी म्हणाली की, आता मी माझ्या प्रियकरासोबतच लग्न करणार आहे. कारण त्याच्या कृत्यामुळे माझं लग्न मोडलं. तर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून यातील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे.
काय आहे प्रकरण? शंभूनगर क्योटरा येथील विजयचं मौदहा कोतवाली येथील एका गावातील मुलीसोबत मागील ५ वर्षापासून अफेअर होतं. लग्नाचं आमिष दाखवून त्याने मुलीसोबत अश्लिल फोटो आणि व्हिडीओ बनवले. ज्यावेळी लग्नाचा विषय आला तेव्हा प्रियकरानं नकार दिला त्याचसोबत संपूर्ण कुटुंबाला लग्नाचा विषय काढला तर जीवे मारू अशी धमकी दिली होती.
त्यानंतर कुटुंबाने मुलीचं लग्न पारगावातील संजयसोबत ठरवलं. सोमवारी वऱ्हाड येणार होतं. परंतु त्याआधीच नवऱ्याच्या मोबाईलवर नवरीमुलीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यात आले. लग्नापूर्वी मुलीचे असे संबंध पाहून नवऱ्या संजयने वऱ्हाड घेऊन जाण्यास नकार दिला आणि ते लग्न मोडलं.