ऑनलाईन फूड विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात मनसे आक्रमक

ऑनलाईन फूड

नागपूर  : ऑनलाइन फुड विक्री सेवा देणाऱ्या झोमाटो, स्विगी आणि उबेर या तिन्ही कंपन्याकडून व्यवसायिक सेवा कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासनाच्या अधिनियमाचे पालन होते. अथवा नाही यासंबंधी मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी सरकारी प्रशासनास दिनांक 30 ऑगस्ट 2018 रोजी लेखी पत्राद्वारे चौकशीची मागणी केली होती. या संबंधात मनसेने मा. पोलीस आयुक्त, नागपूर; मा. जिल्हाधिकारी नागपूर; मी. मनपा, आयुक्त, नागपुर;मा. अप्पर कामगार आयुक्त, नागपूर; मा. सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नागपूर यांना सविस्तर पत्राद्वारे याबाबत अवगत केले होते त्यांची प्रत संलग्र आहे. मनसेने चौकशी संदर्भात केलेल्या मागणीबाबत महानगर पालिका व सहा आयुक्त अन्न व औषधी प्रशासन नागपुर यांनी दखल घेऊन उपरोक्त कंपन्या विरोधात चौकशी करून कार्यवाही सुरू केल्याचे मनसेला पत्राद्वारे कळवले पंजाब गंभीरतेने कारवाई संबंधित प्रशासनाने करायला हवी होती ती अध्याप केली नाही असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कार्यालय व अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने मनसेच्या तक्रारीवर कारवाई केली अथवा नाही याबाबत काहीच कळविले नाही यामुळे प्रशासन केलेल्या तक्रारीचे निवारण गांभीर्याने करत नाही असे शहर अध्यक्ष अजय ढोके  यांनी सांगितले मनसेने पत्रात नमूद केलेल्या आक्षेपांची जोपर्यंत निराकरण होत नाही. तोपर्यंत उपरोक्त ऑनलाइन फूड कंपन्यांनी या कार्यालयाला सील ठोकून त्यांचे व्यवहार व व्यवस्थापन याबाबत सविस्तर चौकशीची मागणी मनसेने संबंधित प्रशासनास केली होती पण प्रशासनाने उदासीन धोरण बघता आता यासंबंधी प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्याशी चर्चा करून मनसेतर्फे संबंधित प्रशासकीय विभाग यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याबाबत विचार केला जाईल असे शहर कार्यकारिणीने स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल एड. विक्रम मारपकवार, उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम व रजनीकांत जिचकार,  विभाग अध्यक्ष सर्वश्री चंदू लाडे, उमेश बोरकर पिंटू बिसेन, शशांक गिरडे, अंकुश भेलकर, उमेश उतखेडे,शहर सचिव घनश्याम निखाडे व शाम पुनियानी, विभाग सचिव महेश माने, सुधीर बोरीकर, राहुल जगताप, आशिष ठाकरे, निखिल कुरंजेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : दांडी येथून सुरू झालेली संविधान सन्मान यात्रा उपराजधानित दाखल