नागपूर : चोरट्यांना संधी मिळाली की त्यांनी हात साफ केलाच समजा. अशीच चोरीला आमंत्रण देणारी घटना अजनीतील हनुमाननगर भागात उघडकीस आली. कुलुपाची चावी आयतीच मिळाल्याने चोरट्याने ‘संधी’चे सोने लुटले.
अर्चना राजेश हर्षे (वय ४७) या सोमवारी दुपारी दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यांनी कुलूपाची चावी दरवाजाजवळ ठेवली. संधी साधून चोराने चावी घेतली. कुलूप उघडून घरात घुसला. देवघरातील स्टीलच्या डब्यातील रोख व दागिने असा एकूण लाखांचा ऐवज लंपास केला. परत चावी तेथेच ठेवून चोरटा पसार झाला.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अर्चना घरी परतल्या असता घरफोडीची घटना उघडकीस आली. अजनी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
अधिक वाचा : आईने मोबाइल सोबत नेल्याने १४ वर्षीय मुलाने घेतला गळफास