नागपुर :- आपण बघतो चोर चोरी करण्याकरीता वेगवेगळी शक्कल लढवीत असतात. मात्र, लोक दारुची तस्करी करण्यासाठी कधी सलाईन बॉटल्स तर कधी गाडी चे ट्यूब तर कढ़ी पेट्रोल टँकचा वापर केलेल्या घटना आपण पाहाल्या आहेत पण, कुणाच्या पॅन्टमधून जर ६० दारूच्या बाटल्या निघाल्या तर आश्चर्य आहे.
ऐकायला नवल वाटत असेल पण नागपूर रेलवे स्टेशन वरील आरपीएफ पोलिसांनी याचा शोध काढला आहे. झाले असे की आरपीएफ पोलीस गस्त घालताना अतिशय ढिले कपडे घातलेला एक व्यक्ती रेल्वे स्थानकावर दिसला. पोलिसांना त्या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी ४४ वर्षीय भैया लाल तेलांगची कसून चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे देशी दारूची तस्करी करत असल्याची कबुली आरपीएफ जवानांना दिली. पोलीस आरोपीची पडताळणी करत असताना एक दोन नव्हे तर तब्बल ६० देशी दारूच्या बाटल्या आरोपीच्या पॅन्टमधून पोलिसांनी काढल्या.
अधिक वाचा : मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला कार्यालय परिसर