नागपूर येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

Date:

नागपूर : शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ‘कपिल नासिरकर‘ नाव असलेल्या युवकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला. या घटनमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून निष्कर्षानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

कपिल नासिरकर हा तरुण नागपूर येथे  सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील न्यू सुभेदार नगर येथे पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. घरापासून जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपावर तो काम करायचा. तेथे त्याला कधी दिवसा तर कधी रात्रपाळीत काम मिळत होते. कपीलची पत्नी खासगी नोकरी करत असल्याने तीदेखील दिवसभर घराबाहेरच असते. दरम्यान, कपिलची पत्नी प्रिया ही तिच्या मुलीला आईकडे सोडून सकाळीच नोकरीवर निघून गेली. परंतु प्रकृती बरी नसल्याने ती आईकडेच थांबली.

सकाळी जेव्हा ती स्वतःच्या घरी परतली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. रात्रपाळीत काम केल्यामुळे कपिल आत झोपला असेल असे तिला वाटले. परंतू उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने तिने घरमालकाला मदतीसाठी बोलाविले. दोघांनी मागच्या दरवाजातून आत प्रवेश केला. तेव्हा कपिल मृतावस्थेत पडल्याचे चित्र पाहून तिला धक्काच बसला.

सूत्रानुसार कपिलच्या मृतदेहावर आणि बिछान्यावर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमाही दिसून येत आहेत. मृतदेहाजवळ नायलॉनचा दोरदेखील आढळून आल्याने कपिलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस तपासासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार आहेत. दरम्यान, या घटनेसंदर्भात पुराव्यांच्या आधारावर घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अधिक वाचा : भीख माँगने पर गुस्साए कार चालक ने बच्चे को बुरी तरह पीटा, बच्चा घायल

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...