वहिनीची हत्या करुन मृतदेहावर अत्याचार, विकृत आरोपीला अटक

Date:

नागपूर : नागपूरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली असून दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केली. हत्येनंतर त्याने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला असून या प्रकरणी पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली आहे.

इंदोरात राहणारा चंद्रशेखर बिंड (२६ वर्ष) हा औषधांच्या दुकानात कामाला आहे. तर त्याच्या नात्यातील भाऊ हा ट्रकचालक आहे. तो पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि वडिलांसह नागपूरमध्येच राहत होता. दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखरचा भाऊ ट्रक घेऊन सातारा येथे गेला. तर त्याचे वडील गावी गेले होते. याचा फायदा घेत चंद्रशेखर बुधवारी दुपारी भावाच्या घरी गेला. भावाची पत्नी आणि चार वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. घरी गेल्यानंतर वहिनीने चंद्रशेखरला पाण्यासाठी विचारले. याचदरम्यान त्याने वहिनीची गळा आवळून हत्या केली. हा प्रकार चार वर्षांच्या मुलीनेही पाहिला होता. म्हणून त्याने चिमुरडीचीही हत्या केली. यानंतर त्याने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि तिथून पळ काढला.

संध्याकाळ झाली तरी घरातून आवाज येत नसल्याने स्थानिकांना संशय आला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उगडला असता हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनात गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृतदेहावर बलात्कार झाल्याचेही उघड झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दिर चंद्रशेखरवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अधिक वाचा : प्रेमप्रकरणातून १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related