नागपूर: कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असले तरी आरोग्य व स्वच्छता सारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना त्यांचे कर्तव्य बजविण्याकरीता मैदानात उतरावे लागते. कोविड-१९ च्या लढाईत उतरलेल्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व सफाई कामगार इत्यादी योध्यांना या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी ७००० ‘फेस शिल्ड’ देण्यात येणार आहे.
महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीने याकरीता पुढाकार घेवून आज दिनांक २० एप्रिल रोजी ७०० ‘फेस शिल्ड’ उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांचेकडे महापौर कक्षात सुपुर्द केल्या. कंपनीने आतापावेतो पोलीस, रेल्वे, शासकीय रुग्णालये आदिंना या ‘फेस शिल्ड’चे नि:शुल्क वितरण केले असून शहराकरीता ५० हजार ‘फेस शिल्ड’ चे उत्पादन करुन शहरात वितरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी प्रभारी उपायुक्त (आरोग्य) डॉ. प्रदीप दासरवार, महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीचे प्लान्ट प्रमुख श्रीकांत दुबे, महाप्रबंधक सचिन तारे, उपमहाप्रबंधक नरेंद्र सातफळे, एच.आर.प्रमुख प्रशांत देशपांडे उपस्थित होते.
Also Read- नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार