भाजपाला हलबा मतदान करणार नाही – महिला जागृती मेळाव्यात निर्णय

Date:

नागपुर : नागपुरातील पांचपावली येथील हलबा सभागृहात महिला जागृती मेळावा महिलांच्या प्रचंड उपस्थित होते. मेळावाच्या सुरवातीला थोर महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी , इंदिरा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करून मेळाव्याची सुरवात झाली. याप्रसंगी काँगेस च्या महिला मेळाव्यात कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आदिम व काँग्रेसच्या वरिष्ठ झुंझार नेत्या ऍड. नंदाताई पराते होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून कुंदा राऊत , अनिता हेडाऊ , मंजू पराते, शकुंतला वट्टीघरे व कल्पना अड्याळकर ह्या मंचावर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

महिला जागृती मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करतांना आदिम व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अड. नंदाताई पराते म्हणाल्या कि विदर्भातील हलबांचा कोष्टी हा व्यवसाय असल्याचा सरकारी इतिहास भाजप नेत्यांनी मागच्या निवडणुकीपूर्वी मान्य केले .भाजपने हलबांच्या मतांवर नागपुरात राजकारण केले आणि नागपुरात सत्ता ताब्यात घेतली . महाराष्ट्रात भाजपाची सरकार सत्तेवर आल्यावर तीन महिन्यात कोष्टी या व्यवसायावरून हलबा , हलबी आदिवासींना जाती दाखले व वैधता दाखले देऊ अशी भूमिका भाजप नेते नितीन गडकरीदेवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले म्हणून विदर्भात हलबांनी भरभरून भाजपाला मतदान केले.

महाराष्ट्रात भाजपने साडेचार वर्षात हलबांना न्याय दिला नाही पण हलबा समाजाशी धोकेबाजी करून फसवणूक केली. काँग्रेसने हलबांना दिलेले संरक्षण भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनकाँग्रेसने हलबांना दिलेले संरक्षण काढून टाकले .हलबा समाजाला भाजपने दारो-दरी लावण्याचे काम केले. भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टात लेखी हमी दिली कि महाराष्ट्रातील हलबा,माना ,हलबी ,गोवारी व धनगर सह इत्यादी ३३ अन्यायग्रस्त आदिम समाजातील कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पर्यंत नोकरीतून काढण्याची कार्यवाही पूर्ण करू. या भाजपचा विश्वासघातामुळे भाजपाला मतदान करणार नाही. या महिला मेळाव्यात हि भूमिका ठरविण्यात आली आहे ,यासाठी घरा -घरात जागृती महिलांनी करावी.

महिला जागृती मेळाव्यात आदिम व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अड. नंदाताई पराते ह्या पुढे म्हणाल्या भाजपने अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखविले . भाजप सत्तेवर आल्यानंतर जनतेचे अच्छे दिन आले नाही तर बुरे दिन अनुभवले आहेत . या देशात कधी नव्हे असे दहशतीचे व नफरतीचे दिवस पाहण्यास मिळत आहे.,संविधानास धोका निर्माण केल्या गेले ,लोकशाहीच्या संवैधानिक संस्था उध्वस्थ केल्या जात आहे . दलित,आदिवासी व ओबीसी मागासवर्गीय समाजावर अन्याय -अत्याचार सुरु केला. भाजपने दरवर्षी २ कोटी रोजगार दिला नाही पण नोटबंदीने गरिबांच्या पोटावर लाथ मारली ,गरिबांचे,व्यापारी ,व्यवसायिकांचे रोजगार हिरावून घेतले ,बेसुमार गरिबी ,बेरोजगारी वाढली .प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख भाजपने पाठविले नाही पण महागाई ,बेरोजगारी दिली म्हणून युवकात प्रचंड असंतोष दिसतो .शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव दिला नाही म्हणून आत्महत्या करीत आहे .भाजपने जाहीर केलेल्या योजना कागदावरच आहे. गरिबांना व शेतकऱ्यांना भाजपने दुखावून अपमानित केले आहे.या नाटकबाज भाजपाला धडा शिकविण्यासाठी जनता वाट पाहत आहे. भाजपाला सत्तेतून फेकण्याचे जनतेने ठरविले असून त्यासाठी मन बनविले आहे.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कुंदा राऊत, अनिता हेडाऊ, मंजू पराते, शकुंतला वट्टीघरे, प्रभा देवघरे, शालू नंदनवार, मंजिरी पौनीकर, नंदा हत्तीमारे , वनिता मौदेकर, मालती आमरे व कल्पना अड्याळकर यांनी भाजपाविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला.

मेळाव्याचे संचालन गीता जळगावकर ह्यांनी तर आभार प्रदर्शन मंदा शेंडे यांनी केले. महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी रेखा मोहाडीकर,निलावती देवघरे, प्रमिला वाडीघरे, रेणुका मोहाडीकर, पुष्पा शेटे , आशा चांदेकर , कमल पराते , सुषमा पौनीकर, रुपाली मोहाडीकर, सरिता बुरडे , कल्पना मोहपेकर , इंदिरा खापेकर , माया धार्मिक , अलका दलाल, ललिता पौनीकर, लता सुभेदार, शारदा खवास , संगीता सोनक, कुंदा निनावे, शेवंता कोहाड,वर्णू पौनीकर,त्रिवेणी पाटणसावंगीकर , नंदा पौनीकर, त्रिलोत्तमा धार्मिक या महिलांनी अथक परिश्रम केले आहे.

अधिक वाचा : लक्ष्मी नगर झोनमध्ये ‘महापौर आपल्या दारी’

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...