पुणे, 3 ऑगस्ट: महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचा बारावीचा म्हणजेच (MSBSHSE HSC Result 2021) HSC चा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. या वर्षी कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाने नेहमीप्रमाणे लेखी परीक्षा घेतलेली नाही. आता अंतर्गत गुण आणि मूल्यांकनाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याने निकाल लावण्यात आलेला आहे. हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 4 नंतर खुला होईल.
कसा बघायचा Result?
बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.