नागपूर : यापूर्वी ज्या मतदान केंद्रांवर मतदान कमी झाले, कुठे सर्वाधिक तर कुठे अनेक मतदारांकडे ओळखपत्रच नाही, अशा संशयास्पद एकूण ४४३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर होणारे मतदान थेट कंट्रोल रूममध्ये लाइव्ह बघता येणार असून ही यंत्रणा आता सज्ज झाली आहे. आयटी क्षेत्रातील ८० तज्ज्ञांची चमू यासाठी सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात ही कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे.
दृष्टिक्षेपात…
मतदारसंघ : मतदान केंद्र : वेब कास्टिंग होणारे केंद्र
दक्षिण-पश्चिम : ३७२ : ३७
दक्षिण : ३४४ : ३५
पूर्व : ३३६ : ३५
मध्य : ३०५ : ३१
पश्चिम : ३३२ : ३१
उत्तर : ३६० : ३६
काटोल : ३२८ : ३२
सावनेर : ३६६ : ३७
हिंगणा : ४३४ : ४४
उमरेड : ३८४ : ३९
कामठी : ४९४ : ४८
रामटेक : ३५७ : ३६