नागपूर, ता. २४ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागपुरातही १४ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन’ करण्यात आल्यामुळे तोपर्यंत नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘लॉक डाऊन’ला नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. केवळ १४ एप्रिलपर्यंत सर्वांना आपल्या घरातच राहायचे आहे. संयमाने घरात राहावे. स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवावे. सामान्य जनतेला आवश्यक सामान उपलब्ध व्हावे यासाठी कारणा दुकान, मेडिकल स्टोअर्स, दूध, भाजी आदींची दुकाने सुरू असतील. या सामानांसाठी शासनाने आवश्यक ती व्यवस्था केली आहे. त्यामुळे सामानाचा विनाकारण साठा करु नका. शासन आणि मनपाच्या प्रयत्नांना मदत करा आणि कोरोनासोबतची लढाई जिंका, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
Also Read- आता संपूर्ण नागपुरात होणार ‘कोरोना’ सर्व्हे मनपाचे पाऊल : नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन