नागपूर : आजच्या युगात आधुनिक पद्धतीत होणाऱ्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी वर्ग ११ तसेच १२ विज्ञान शाखेचे विध्यार्थी आपला अमूल्य वेळ, आरोग्य, पैसा इत्यादी खर्चकरून स्वप्नपूर्तीसाठी अत्याधिक धावपळ करीत आहेत. या वर्तमान परिस्थितीत वर शहरातील खाजगी संस्थेच्या संचालकाने विध्यार्थी तसेच पालक यांचे वास्तविक स्वप्न पूर्ण करण्याकरीता विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान अतिआधुनिक असून ठरलेल्या वेळेत विषयाचे लाईव प्रसारण केले जाते. तसेच विषयाशी निगळीत असलेल्या अडचणी, प्रश्न, अभ्यासाची तयारी इत्यादी विषयावर शिक्षक आणि नोंदणी कृत विध्यार्थी यांच्या मध्ये सामूहिक चर्चेची सुविधा देत आहे. या चर्चेसाठी अन्य उपकरणाची गरज नाही. या लाईव प्रसाराचा उपयोग विधार्थी लॅपटॉप आणि इंटरनेट च्या मदतीने त्यांच्या घरी बसून करू शकतात. हि सुविधा एक गाव, शहर किंवा राज्यापुरती मर्यादित नसून याचा उपयोग विश्वव्यापी आहे. हे प्रसारण विदयार्थीपर्यंत पोहचवण्यासाठी संस्थेने “लाईव पाठशाळा” हा उपक्रम सुरु केला आहे.
अधिक वाचा : सकारात्मकता व तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर शाळेला वेगळ्या उंचीवर न्या : आयुक्त रवींद्र ठाकरे