‘हे जीवन खूपच निर्दयी आहे’, असे ट्विट करत त्याने नागपूरच्या त्या मुलीची मदत करण्याचे आवाहन

Bollywood actor sonu sood

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान अनेक मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू सूदने अनेकांना औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन मिळून देत आहे. त्यामुळे अनेकांसाठी सोनू सूद देवदूत ठरला आहे. मात्र आता या देवदूताला लोकांकडे मदतीसाठी हात जोडावे लागत आहेत. त्याने एका अनाथ मुलीसाठी सोशल मीडियावर लोकांकडे मदत मागितली आहे. त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होते आहे.

अभिनेता सोनू सूदने ट्विटरवर पोस्ट शेअर करून मदत मागितली आहे. सोनूने ट्विटमध्ये म्हटले की, मी झोपेतून उठलो आणि मला ही बातमी कळली की त्या मुलीच्या आईचेदेखील निधन झाले. आता ही छोटीशी मुलगी अनाथ झाली आहे. कृपया अशा सर्व कुटुंबांना सहकार्य करा. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. जर तुम्ही मदत नाही करू शकत तर मला सांगा. मी करेन मदत. हे जीवन खूपच निर्दयी आहे.

एका १९ वर्षीय मुलीला तिच्या संपूर्ण कुटुंबासह कोरोनाची लागण झाली होती. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी तिच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्याचवेळी तिच्या आई-वडिलांची तब्येतदेखील गंभीर झाली होती. त्याच्या दोन दिवसांनी लगेचच वडिलांचे निधन झाले. कुटुंबात एकानंतर एक मृत्यू सत्र सुरूच असताना अचानक दुसऱ्या दिवशी आईनेही या १९ वर्षीय मुलीची साथ सोडली आणि कोरोनामुळे त्यांचे ही निधन झालं. त्यामुळे आता ही मुलगी अनाथ झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

हे समजल्यानंतर अभिनेता सोनू सूद खूप दुःखी झाला. त्यानंतर कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या अनाथ मुला-मुलींची मदत करण्याचा निर्णय सोनू सूदने घेतला आहे.